देशातील आतापर्यंतची सर्वात गंभीर घटना - देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

PM मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीवरुन देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे

Updated: Jan 6, 2022, 02:49 PM IST
देशातील आतापर्यंतची सर्वात गंभीर घटना - देवेंद्र फडणवीस यांचा आरोप title=

मुंबई : पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM MODI) यांच्या ताफ्यातील सुरक्षेत त्रुटी आढळल्यानंतर पंतप्रधानांना आपला पंजाब दौरा अर्धवट सोडून परतावं लागलं होतं. आता यावरुन देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली आहे. काल पंजाबमध्ये घडलेली आतापर्यंतची देशातील सर्वात गंभीर घटना असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

राज्यात वेगवेगळ्या पक्षांचे सरकार असतात, पण देशांतल्या पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत असा खेळ कधीच झाला नव्हता, ही विचारपूरक घटना असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पीएम दौरात एसओपी कायम असते. राज्य आणि केंद्र समन्वयाने काम करतं. पण राज्याला माहितीच नाही असं होऊ शकत नाही. आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी होते. रोड ब्लॉक होईल अस जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. 

पीएम यांचा जीव धोक्यात टाकण्याचे जाणिवपूर्वक काम करण्यात आल्याचा आरोप करत फडणवीस यांनी घटनेचा निषेध केला आहे. राष्ट्रपती यांना विनंती पीएम सुरक्षा संदर्भात जे घडले ते देशाने गंभीर घेतले पाहिजं असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेबाबतच्या घटनेनंतर काँग्रेस नेत्यांनी केलेली वक्तव्य निर्लज्जतेचा कळस आहेत, १२५ वर्ष जूना पक्ष कुपमंडूक मनोवृत्ती दाखवत असून भाजप त्यांना धडा शिकवेल असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.