मुकेश अंबानी यांना बेवारस कारमध्ये धमकीचे पत्र; सुरक्षा वाढवली

कोण आहे मुकेश अंबानी यांचे शत्रू?

Updated: Feb 26, 2021, 03:36 PM IST
मुकेश अंबानी यांना बेवारस कारमध्ये धमकीचे पत्र; सुरक्षा वाढवली  title=

मुंबई : मुंबईतल्या अल्टामाऊंट रस्त्यावरील मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराजवळ स्फोटकांची कार आढळून आल्यामुळे खळबळ माजली आहे. या गाडीची बॉम्ब शोध पथकानं तपासणी केली असून यातून २० जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या आहेत. तसेच या कारमध्ये धमकीचे पत्र देखील आढळून आले आहे. या प्रकारानंतर मुकेश अंबानी यांच्या घराजवळील सुरक्षेत वाढ झाली आहे. 

त्यामुळे या कारची कसून तपासणी करण्यात आली. स्फोटकं सापडल्यामुळे मोठा घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच धमकीचे पत्र असल्यामुळे मुकेश अंबानींचा शत्रू कोण? असा देखील सवाल विचारला जात आहे. 

गाडीच्या आत जिलेटिन काड्यांसोबत  एक चिट्ठीही सापडली आहे. या चिठ्ठीत धमकी लिहिण्यात आली आहे.  गाडीवर असलेल्या नंबर आणि मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्यांच्या नंबर मधील एका गाडीचा नंबर सारखाच आहे. घातपाताचा कट उधळून लावण्यात आलाय मात्र हा प्रकार कोणी केला याचा शोध घेतला जात आहे.

 उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ कार आढळून आली आहे. मुकेश अंबानी यांची मुंबईतील अँटेलिया बिल्डिंगजवळ ही  कार उभी होती, या ठिकाणी पोलीस आणि बॉम्बस्कॉड पथक पोहोचलं आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे देखील या ठिकाणी पोहोचले आहेत. या गाडीत कोणतेही स्फोटकं आढळून आली आहेत, २५ जिलेटीनच्या कांड्या आढळल्याचं सांगण्यात येत आहे.

या ठिकाणांहून मंत्रालय, राजभवन याकडे जाणारे रस्ते असल्याने हे गंभीरतेने घेतलं जात आहे. या गाडीची तपासणी मागील काही मिनिटांपासून सुरु आहे, मात्र या गाडीत कोणतेही स्फोटकं आढळून आली असल्याचं सांगण्यात येत आहे. या ठिकाणी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरापासून जवळच ही गाडी उभी असल्याने संशय व्यक्त केला जात आहे. क्राईम ब्राँचकडे या घटनेचा तपास देण्यात आला आहे.