Cyclone Tej In Arabian Sea: अरबी समुद्रामध्ये सोमवारी रात्री कमी दाबाचं श्रेत्र निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मान्सून परतीच्या वाटेवर असतानाच हा कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळामध्ये रुपांतरित होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अरबी समुद्रामध्ये अग्नेय दिशेला चक्रीवादळाची स्थिती निर्माण होऊ शकतो. मात्र चक्रीवादळ नक्कीच निर्माण होईल याबद्दल असाच ठामपणे सांगता येणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. दुसरीकडे पूर्व किनारपट्टीलाही चक्रीवादळाचा धोका आहे. देशाच्या दोन्ही किनारपट्ट्यांवर चक्रीवादळं निर्माण झाल्यास ती पुढील 9 दिवसांमध्ये धडक देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
खासगी हवामान संस्था असलेल्या 'स्कायमेट वेदर'ने यासंदर्भातील माहिती दिली आहे. भूमध्यरेषेला लागून असलेल्या श्रेत्राच्या बाजूला अरबी समुद्राच्या वायव्येकडील भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. या ठिकाणी हिंदी महासागरातील वातावरण गरम असल्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यास सकारात्मक स्थिती निर्माण झाली आहे. वाऱ्याचा वेग, दिशा यासारख्या गोष्टी कमी दाबाचा पट्टा आणि त्यानंतर निर्माण होण्याऱ्या चक्रीवादळासंदर्भातील इशारा देत आहेत.
'स्कायमेट वेदर'ने 13 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या अहवालामध्ये, "15 ऑक्टोबरच्या आसपास दक्षिणपूर्ण अरबी समुद्रावर चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यात आहे. पुढील 72 तासांमध्ये समुद्रामध्ये हा कमी दाबाचा पट्टा दक्षिण-मध्य भागाकडे सरकू शकतो. हा कमी दाबाचा पट्टा मध्यम स्वरुपाचा आहे. मात्र प्रतिकूल पर्यावरणासंदर्भातील स्थितीमुळे या वाऱ्यांचं रुपांतर चक्रवादळामध्ये वेगाने होण्याची शक्यता फारच कमी आहे," असं म्हटलं आहे.
एका ठराविक ठिकाणी असलेला वाऱ्याचा वेग, दिशा आणि कशापद्धतीने वार वाहतोय याची माहिती देणाऱ्या आयओडीनुसार समुद्रामधील दोन्ही भागांवरील तापमानामध्ये फरक असल्याचं निर्देशित होत आहे. दर आठवड्याला तसेच महिन्याला वाऱ्याची स्थिती मोजणाऱ्या एमजेओ म्हणजेच मॅडेन-ज्यूलियन ऑसिलेशन भूमध्य रेषेजवळ असलेलं ढगाळ वातावरण आहे. ही परिस्थिती जवळपास दर 30 ते 60 दिवसांनी कमी अधिक प्रमाणात असते. प्राथमिक अंदाजानुसार, आदर्श परिस्थितीमध्ये संभाव्य कमी दाबाचं क्षेत्र चक्रवादळामध्ये परावर्तित होऊ शकतं. चक्रीवादळ निर्माण झालं तर पूर्व नियोजित यादीनुसार त्याचं नाव 'तेज' असं ठेवलं जाईल.
प्राथमिक अंदाजानुसार बंगालच्या उपसागरामध्येही अशाप्रकारचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. 19 ते 28 ऑक्टोबर 2023 दरम्यान अरबी समुद्रामध्ये ओमानच्या आसपास आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळ निर्माण झाल्यास ओडिशा, पश्चिम बंगाल, बांगलादेशला फटका बसेल. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाला हामून असं नाव दिलं जाईल.