Mansukh Hiren : घटनास्थळी एटीएस क्राईम सीन रिक्रिएट करण्याची शक्यता

 एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती समजून घेतली.    

Updated: Mar 7, 2021, 08:43 PM IST
Mansukh Hiren : घटनास्थळी एटीएस क्राईम सीन रिक्रिएट करण्याची  शक्यता title=

मुंबई : मनसुख यांचा मृतदेह ज्या रेतीबंदर परिसरात आढळून आला त्या परिसरात एटीएस क्राईम सीन रिक्रिएट करणार असल्याची माहिती सूत्रांनी  दिली आहे. मनसुख यांचा मृतदेह तिथे कसा आला हे जाणून घेण्यासाठी एटीएस क्राईम सीन पुन्हा रीक्रियेट करणार असल्याची माहिती समोर येत आहे. एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती समजून घेतली. एटीएसकडून मनसुख यांच्या घरापासूनचे सीसीटीव्ही फुटेजही पडताळण्यात येणार आहे.

दरम्यान, मनसुख  हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झालाय. एटीएसनं हा गुन्हा दाखल केला.  मनसुख यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी केली होती.  त्यानंतर एटीएसनं हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एटीएसनं सगळी कागदपत्रं मुंब्रा पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेतलीयत आणि पुढचा तपास सुरू केला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन यांच्या शरीरावर जखमा आढळल्या नाहीत. त्यांच्या मृतदेह जवळपास 10 तास पाण्यात असल्याची शक्यता शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होत आहे.  पण या खुणा कधीच्या आहेत, हे मात्र कळू शकलेलं नाही.