राणेंविरोधात पोस्टरबाजी, शिवसेना प्रवक्त्यांविरोधात गुन्हा दाखल

नारायण राणेंविरोधातली पोस्टरबाजी शिवसेना नेत्याच्या अंगलट आली आहे.  राणेंविरोधात पोस्टरबाजी केल्यानंतर शिवसेनेचे अरविंद भोसले यांच्यावर वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Updated: Sep 26, 2017, 11:23 AM IST
राणेंविरोधात पोस्टरबाजी, शिवसेना प्रवक्त्यांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : नारायण राणेंविरोधातली पोस्टरबाजी शिवसेना नेत्याच्या अंगलट आली आहे.  राणेंविरोधात पोस्टरबाजी केल्यानंतर शिवसेनेचे अरविंद भोसले यांच्यावर वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अरविंद भोसले हे शिवसेनेचे नगरसेवक आणि प्रवक्ते आहेत.अरविंद भोसले यांनी नारायण राणे यांच्यावर खालच्या भाषेत पोस्टरमधून टीका केली होती. महापालिकेच्या तक्रारीनंतर भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय.

दरम्यान, कोणताही वाद अधिक वाढू नये म्हणून मुंबई महापालिकेने हे पोस्टर हटविले आहे. दरम्यान, माजी खासदार नीलेश राणे हे अधिक आक्रमक झालेत. त्यांनी ट्विट करत याला चोख प्रत्त्युतर देण्याची भाषा केलेय. मुंबईत या पेक्षाही वाईट भाषेत पोष्टर लागतील असे म्हटलेय. त्यामुळे राणे आणि शिवसेना वाद अधिक उफाळण्याची शक्यता आहे.