लढत प्रसाद लाड आणि दिलीप माने यांच्यात

आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं दोन्ही बाजूनी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.  

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 27, 2017, 12:49 PM IST
लढत प्रसाद लाड आणि दिलीप माने यांच्यात title=

मुंबई : विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी 7 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीत, भाजपकडून प्रसाद लाड यांना तर काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी मिळाल्याचं आता स्पष्ट झालंय. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं दोन्ही बाजूनी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.  

शिवसेना ही भाजपाच्या उमेदवारास पाठिंबा देणार

आज सकाळी ११ वाजता लाड अर्ज भरणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे शिवसेना ही भाजपाच्या उमेदवारास पाठिंबा देणार असल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या फोनवर बातचीत झाली असल्याचं पुढे आलं आहे. 

काँग्रेसची दिलीप माने यांना उमेदवारी

तिकडे काँग्रेसनं दिलीप माने यांना उमेदवारी दिली आहे. माने यांच्या नावावर काल सोलापूरमध्ये चर्चा झाली. यावेळी मानेही आज सकाळी अर्ज भरणार आहेत.  पण शिवसेनेनं पाठिंबा दिली नाही, तर त्यामुळे आता त्यांची उमेदवारी फक्त नावापुरतीचं उरणार आहे. विधानपरिषदेसाठीच्या निवडणुकीत विधानसभेचे आमदार मतदान करतात.