राज ठाकरेंनी बोलवली विभाग प्रमुखांची तातडीची बैठक

मुंबईत पुन्हा एकदा मनसे कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 27, 2017, 12:51 PM IST
 राज ठाकरेंनी बोलवली विभाग प्रमुखांची तातडीची बैठक title=

दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा मनसे कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. विक्रोळीतल्या टागोरनगर ग्रुप नंबर 3 मध्ये फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केली. 

राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व विभाग प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज ठाकरे नेमकं काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे, कारण राज ठाकरे यांच्या पक्षाचे पदाधिकाऱ्यांची फेरीवाल्यांकडून मारखाण्याची ही दुसरी वेळ आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली असल्याचं बोललं जात आहे.

विक्रोळीतील ४ पदाधिकाऱ्यांना मारहाण

यात मनसे पदाधिकारी विक्रोळी विभाग अध्यक्ष विनोद शिंदे, विभाग उपाध्यक्ष विश्वजीत ढोलम, यांच्यासह कार्यकर्त्यांनाही मारहाण केली गेली. जखमींना केईएम आणि फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी

रात्री उशीरा राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. विक्रोळी परिसरात तणावाचं वातावरण असून विक्रोळी पूर्वमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.