अमित जोशी, झी मीडिया. मुंबई : राज्यात सध्या 4331 गावं आणि 9470 वाड्यांमध्ये एकूण 5 हजार 493 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. यामध्ये फक्त 213 शासकीय टँकर असून तब्बल 5 हजार 280 खाजगी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे सध्या खाजगी टँकर लॉबीची चांगलीच चलती आहे.
राज्यात सध्या फक्त 14.92 टक्के पाणीसाठा धरण आणि जलाशयांमध्ये शिल्लक आहे. यामध्ये औरंगाबाद विभागात सर्वात कमी म्हणजे 3.02 टक्के, नागपूर विभागात 9.18, नाशिकमध्ये 14.37 टक्के, पुण्यात 15.88, अमरावतीमध्ये 21.86, कोकणात 35.91 टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक धरणांमधील उदा जायकवाडी, उजनी सारख्या मोठ्या धरणांमधला मृत पाणीसाठा वापरायला आधीच सुरुवात झाली आहे.
राज्यात 1417 चारा छावण्या सुरू असून यामध्ये एकूण 9,41,372 जनावरे आहेत.