ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्यासाठी रेल्वेची तयारी पूर्ण

 रेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याची

Updated: Apr 19, 2021, 09:23 PM IST
 ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्यासाठी रेल्वेची तयारी पूर्ण  title=

मुंबई :  रो-रो सेवा माध्यमातून ७ रिक्त टँकर असलेली मालगाडी आज कळंबोली माल यार्डमधून विशाखापट्टणम येथे पाठविण्यात आली. कोविड-१९ विरोधातील लढ्याला सामोरे जाताना रेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याची तयारी केली आहे.  

टीम मुंबई विभागाने फ्लॅट वॅगन्समध्ये/मधून टँकर लोड/अनलोड करणे सुलभ होण्यासाठी कळंबोली माल यार्ड येथे २४ तासांच्या आत रात्रभरात रॅम्प तयार केला.  रो-रो सेवा ७ रिक्त टँकरसह असलेली मालगाडी वसई रोड, जळगाव, नागपूर, रायपूर जं मार्गे ईस्ट-कोस्ट रेल्वे झोनमधील विशाखापट्टणम स्टील प्लांट साइडिंगकडे जाईल.

जिथे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन असेल. ही गाडी आज 8.05pm ला कळंबोली यार्ड मधून रवाना झाली.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्येही रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली आणि पुरवठा साखळी कायम ठेवली आणि आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्राची सेवा सुरू ठेवली आहे.