यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची ही ठिकाणं तुंबणार...

पावसाचे पाणी उपसण्यासाठी २७९ पंप भाड्याने घेतले जाणार आहेत... त्यासाठी ५४ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

Updated: May 30, 2018, 09:50 PM IST
यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची ही ठिकाणं तुंबणार...   title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी... यंदा मुंबई तब्बल २२५ ठिकाणी तुंबण्याची शक्यता आहे. ही सगळी दृश्यं २९ ऑगस्ट २०१७ ची... मुंबई तुंबई झाली होती तेव्हाची... यंदाच्या पावसाळ्यात तर मुंबईत पाणी तुंबण्याचा जास्त धोका आहे... मुंबईत दरवर्षी जवळपास ६० ठिकाणी पाणी साचतं.... पण यंदाच्या वर्षी तब्बल २२५ ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणातच हे समोर आलंय... मुंबईत सध्या विविध विकासकामं सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे... या खोदकामामुळे बऱ्याच ठिकाणच्या पर्जन्य जलवाहिन्यांचा मार्ग बदलला आहे. या सगळ्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबई तुंबण्याची शक्यता आहे, अशी माहिती पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे मुख्य अभियंते विद्याधर खणकर यांनी दिलीय. 

मुंबईतल्या सतरा ठिकाणांवर प्रामुख्यानं पाणी तुंबण्याची शक्यता आहे...  

- वांद्रे पूर्व 

- भायखळा

- चेंबूर

- मुलुंड

- घाटकोपर

- गोरेगाव पश्चिम

- बोरीवली पश्चिम

- सायन

- किंग्ज सर्कल

- कुर्ला

- वांद्रे

- माहीम

- खार

- दादर

- माटुंगा

या ठिकाणांवर पाणी साचेल, असा अंदाज आहे. पावसाचे पाणी उपसण्यासाठी २७९ पंप भाड्याने घेतले जाणार आहेत... त्यासाठी  ५४ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. नेमेची येतो पावसाळा आणि नेहमीच तुंबते मुंबई.... अशी परिस्थिती असते. यंदा हा का जास्तच वाढलाय. हा धोका ओळखून महापालिका त्यांचं काम चोख करेल, अशी अपेक्षा आहे. पण मुंबईकरांनो, तुम्हीही काळजी घ्या...