नगरसेवक, आमदार फक्त काय ओरबडायला व्हायचंय? राज ठाकरेंचा सवाल

Raj Thackeray Exclusive Interview : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अभिनेता सुबोध भावेने आज मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी महाराजांची त्या ओळीची आठवण करुन दिली.

शैलेश मुसळे | Updated: Oct 16, 2022, 08:22 PM IST
नगरसेवक, आमदार फक्त काय ओरबडायला व्हायचंय? राज ठाकरेंचा सवाल title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज हरहर महादेव (Harhar mahadev) सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज्यातील परिस्थितीवर देखील भाष्य केलं. यावेळी त्यांनी राजकारण्यांना टोला ही लगावला. राज ठाकरे यांनी मुलाखतीत (Raj Thackeray interview) बोलताना म्हटले की, छत्रपतींनी दिलेल्या संदेशावर महाराष्ट्र घडवावा. अशी एक लाईन मी प्रिंट करुन घेतली आहे. शासकीय अधिकारी आणि पक्षाच्या लोकांना ती पाठवली जाईल. 'कारभार ऐसा करावा की रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लावणे'

राज ठाकरे यांनी या ओळीचा अर्थ सांगताना म्हटले की, 'महाराजांनी मला सर्वात आवडणारी ही ओळ आहे. राजकारण या क्षेत्राची संपूर्ण बाजुने बजबजपुरी झालेली आहे. जो माणूस रयतेचा इतका विचार करतो की, रयतेला तुमचा त्रास नाही झाला पाहिजे.'

'आता फक्त ओरबडणं सुरु आहे. हे ओरबाडणं थांबलं पाहिजे. नगरसेवक, आमदार व्हायचंय पण का व्हायचंय. फक्त ओरबडायला.? हे थांबलं पाहिजे. निवडणूक आणि पक्ष चालवायला पैसे लागतात का? हो लागतात, पण किती लागतात.?'

'हे काय कोणाला टोला लगावण्या सारखं नाहीये. नाहीतर म्हणाल भाजपला टोला लगावला आहे. राजा असा असावा की त्याला द्यायची सवय असली पाहिजे घ्यायची नाही.'असं देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.