झुनझूनवालांचा सर्वात खास शेअर 'Titan'देऊ शकतो धमाकेदार रिटर्न्स ; गुंतवणूकीसाठी परफेक्ट टायमिंग

राकेश झुनझूनवालांचे नाव ज्या शेअरसोबत येते त्या शेअरच्या किंमती नक्कीच उसळी घेत असता

Updated: Jun 25, 2021, 02:39 PM IST
झुनझूनवालांचा सर्वात खास शेअर 'Titan'देऊ शकतो धमाकेदार रिटर्न्स ; गुंतवणूकीसाठी परफेक्ट टायमिंग title=
representative image

मुंबई : राकेश झुनझूनवालांचे नाव ज्या शेअरसोबत येते त्या शेअरच्या किंमती नक्कीच उसळी घेत असतात. त्यामुळे त्यांना शेअर मार्केटमधील बिग बुल म्हटले जाते. झुनझूनवाल्यांच्या पोर्टफोलियोमध्ये अनेक दमदार शेअर्स आहेत. परंतू सध्या त्यांचा सर्वात खास शेअर आहे Titan! 

टायटनचा शेअर राकेश राकेश झुनझूनवाला यांचा सर्वात पहिली पसंती आहे. सर्वात मोठी भागीदारी असलेल्या कंपनीचा हा शेअर या दिवसांमध्ये चांगली उसळी घेत आहे. राकेश झुनझूनवाला आणि त्याची पत्नी रेखा झुनझूनवाला या दोघांकडे टायटन कंपनीचे एकून 4.49 कोटींचे शेअर्स आहेत. गेल्या महिन्यांत या शेअर्सने तब्बल 13 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

एका वर्षात टायटनने दिले 81 टक्के परतावा
इंट्रा डे ट्रेडिंगमध्ये टायटनच्या शेअर्समध्ये चढ उतार दिसत असतो. सध्या हा शेअर 1770 रुपयांच्या जवळपास ट्रेंड करीत आहे. नुकताच या शेअरने 52 हफ्त्यांपासूनची उच्चांकी गाठली आहे.

टायटनमध्ये येत असलेल्या तेजीमुळे गेल्या 5 दिवसात हा शेअर 5 टक्के वाढला आहे. गोल्ड हॉलमार्किंगचा या कंपनीला फायदा होणार आहे. त्यामुळे येत्या काळात हा शेअर 1800 चा आकडा पार करण्याची शक्यता आहे.