82 वर्षीय रतन टाटांचा तरूणपणीचा फोटो व्हायरल

सोशल मीडियावर 8 लाखहून अधिक फॉलोअर्स 

Updated: Jan 24, 2020, 01:58 PM IST
82 वर्षीय रतन टाटांचा तरूणपणीचा फोटो व्हायरल

मुंबई : टाटा ग्रुपचे 82 वर्षीय चेअरमन रतन टाटा यांनी गुरूवारी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या या फोटोची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. लॉस एंजिल्समधील हा फोटो भारतात येण्यापूर्वीचा आहे. रतन टाटांनी आपल्या तरूणपणीचा फोटो शेअर करून सगळ्यांनाच थक्क केलं आहे. 

इंस्टाग्रामवर रतन टाटांनी आपला 25 वर्षाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो एखाद्या अभिनेत्याला लाजवेल असा आहे. एका युझरने म्हटलं की, रतन टाटा एखाद्या हॉलिवूड स्टारप्रमाणे दिसत आहेत. रतन टाटांनी अमेरिकेत शिक्षण घेतले आणि काही काळ काम केल्यानंतर 1962 मध्ये भारतात परतले. त्यावेळी ते अवघे 25 वर्षांचे होते. 

टाटा यांनी लिहिले आहे की,'बुधवारी मी हा फोटो शेअर करणार होतो. मात्र मला कुणीतरी #ThrowbackThursday यबद्दल सांगितलं. या हॅशटॅगसोबत जुने फोटो शेअर करतात.' त्याप्रमाणे त्यांनी आपला 25 वर्षांचे असतानाचा फोटो शेअर केला आहे. 

महत्वाचं म्हणजे 3 तासात जवळपास 1 लाख 81 हजार लोकांनी हा फोटो पाहिला असून त्याला लाईक केलं आहे. 30 ऑक्टोबरपासून रतन टाटा इंस्टाग्राम या सोशल मीडियावर ऍक्टिव आहेत. त्यांचे आतापर्यंत 8 लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत.