मुंबई : रतन टाटा यांच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची व्यक्ती ठरली ती त्यांची आजी. रतन टाटा यांची त्यांच्या आजीने कशी काळजी घेतली, आजीवर ही वेळ का आली. हे सर्व शांता शेळकेंच्या कवितेतल्या पैठणीच्या काट-पदरासारखे कठीण-मऊ प्रसंग रतन टाटा यांनी अगदी साधेपणाने उलगडून सांगितले आहेत.
रतन टाटा म्हणतात, 'माझ्या आजीने मला तळहातावरच्या फोडासारखं जपलं. कारण माझ्या आईने दुसरं लग्न केल्यानंतर शाळेत वर्गाचील मुलं आमच्याबद्दल काहीही बोलत असत. त्या मुद्द्यावरून मला त्रास देत होते, मला डिवचत होते, चिडवत होते. पण आमची आजी नेहमीच आम्हाला सांगत असे, अशावेळी शांत राहा, कुणालाही उलट बोलू नकोस, संयम ठेव, संयमी हो, अतिशय शांत राहा, कारण आपल्याला काहीही झालं, तरी आपली प्रतिष्ठा ही कायम ठेवायची आहे.'
रतन टाटा यांच्या आयुष्यात सर्वात जवळची व्यक्ती ठरली त्यांची आजी, कारण आईवडिलांची फारकत (डिव्हॉस) झाली होती.
पहिल्या टप्प्यात त्यांनी लिहिलं आहे, माझं बालपण खूपच छान होतं. पण जस-जसे माझे भाऊ आणि मी मोठा होत गेलो आम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागला.
कारण होतं माझ्या आईवडिलांनी एकमेकांना दिलेली सोडचिठ्ठी अर्थात आजच्या युवकांना सहज सोपा वाटणारा शब्द डिव्हॉस. कारण आज हा शब्द लोकांना सोपा वाटत असला तरी त्या काळात तसं काही नव्हतं.
रतन टाटा यांच्या बाबांसारखेच तुमचे बाबाही विचार करतात का?