मुर्तीकार रेश्मा खातू जपतेय बाबांचा वारसा

तोच वारसा रेश्मा खातू कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

Updated: Aug 19, 2018, 10:46 PM IST
मुर्तीकार रेश्मा खातू जपतेय बाबांचा वारसा  title=

सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : सुप्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांची कन्या रेश्मा खातू हिने मोठ्या निर्धाराने मोठ्या गणेशमूर्ती घडवण्याचे काम सुरू ठेवले. एक महिला पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपला ठसा उमटू पहात असताना सरकारने तिला मदत करणे आवश्यक होते. पण तिच्याकडे असलेली परळ येथील सेंट्रल रेल्वे वर्कशॉपची जागाही गेली. तरीही रेश्मा डगमगली नाही. तिने नवीन जागा मिळवत मूर्ती घडवण्याचे काम सुरू ठेवले आहे.दरवर्षी मूर्तिकार विजय खातू हे काही तरी नवीन द्यायचे. खातूंचा तोच वारसा रेश्मा खातू कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

जबाबदारी स्वीकारली 

गेल्यावर्षी गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असताना ज्येष्ठ मूर्तिकार विजय खातू यांचे निधन झाले. अचानक झालेल्या या आघातामुळे कुटुंबीय हादरून गेले. असे असताना डगमगून न जाता कामाची धुरा त्यांची मुलगी रेश्मा हिने हाती घेतली. गेल्या वर्षी ती यशस्वीरित्या पारही पडली.

कारखान्याची जबाबदारी खंबीरपणे स्वीकारली  कुटुंबातील मोठी मुलगी म्हणून रेश्मानं या सगळ्याचा विचार केला  आणि आता ती तिच्या बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटतेय...

 यंदाच्या गणेशोत्सवाची  पहिली मनाच्या महागणपतीची मूर्ती रेश्मा ह्यांच्या कार्यशाळेतून बाहेर पडली ज्याच्यामुळे एक वेगळेच समाधान त्यांनच्या चेहेऱ्यावर उमटले . वडिलांचे कलेतील योगदान सक्षमपणे झेलण्यात सफल झालेली रेश्मा ने गणेशमूर्ती घडवण्यासाठी स्वतःला  संपूर्णपणे  झोकून दिलयं.