नीरव मोदीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं होळीत दहन होणार

होळीच्या दिवशी समाजातील वाईट प्रवृत्तीचं दहन करण्याची प्रथा आहे.

Updated: Mar 1, 2018, 02:36 PM IST
नीरव मोदीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं होळीत दहन होणार  title=

मुंबई : होळीच्या दिवशी समाजातील वाईट प्रवृत्तीचं दहन करण्याची प्रथा आहे.

वरळी परिसरात होळी आणि धुळवडीचा उत्साह जबरदस्त असतो. होळीपूर्वी वरळीतील बीडीडी चाळींमध्ये समाजातील वाईट गोष्टींचे देखावे तयार करून ते जाळण्याची परंपरा आहे. यंदा इथल्या रहिवाशांनी नीरव मोदीचा पुतळा जाळला आहे. वरळीतील बीडीडी चाळीतील श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं 11500 कोटींचा घोटाळा करणाऱ्या निरव मोदीच्या 58 फूट उंचीच्या प्रतिकृतीचं दहन करणार आहेत. 

भारतातील सर्वात उंच होळी 

मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आम्ही मुंबईतील सर्वात उंच होळी उभारली आहे. आताही आम्ही तसच केलं आहे. 58 फूट उंच होळीत 30 फूट उंच पुतळा उभा केला आहे. तसेच हा पुतळा मंडळानेच तयार केला आहे. यासाठी आम्ही सुरूवातीपासूनच यासाठी एकत्र येतो.