'उद्योगाचा डोलारा पुन्हा स्थिर करण्याची हिंमत दाखवायला हवी'

महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी उद्योगमंत्री पावले उचलत आहेत.  

Updated: May 30, 2020, 10:56 AM IST
'उद्योगाचा डोलारा पुन्हा स्थिर करण्याची हिंमत दाखवायला हवी'

मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी उद्योगमंत्री पावले उचलत आहेत. उद्योगाचा रथ दोन-चार घोड्यांचा नाही. शंभर घोडे आणि पाचशे चाकांचा हा रथ सुरु होता म्हणून महाराष्ट्राचा डोलारा उभा राहिले आहे. तो आता कोरनामुळे डळमळला आहे. पण तो पुन्हा स्थिक करण्याची हिंमत दाखवायला हवी. दरम्यान, कोरोना संकटकाळात देशाचे उद्योगमंत्री नेमके काय करीत आहे, असा सवाल शिवसेनेने उपस्थित करीत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचवेळी 'उद्योगाचा डोलारा पुन्हा स्थिर करण्याची हिंमत दाखवायला हवी', असे म्हटले आहे.

अर्थकारणाचे आणि उलाढालीचे अनेक छोटे-मोठे व्यवसाय आहेत. टाटा, बिर्ला, बजाज, महिंद्रा, अजीम प्रेमजी एवढ्यापुरतेच ते मर्यादित नाहीत. वडापाव विकणाऱ्या गाड्यांचे एक स्वतंत्र अर्थकारण आहे. ते सुद्धा ठप्प झाले आहे, याबाबत शिवसेनेने चिंता व्यक्त केली आहे. देशाचे उद्योगमंत्री काय करत आहेत, असा सवाल उपस्थित करत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उद्योग, व्यापार, रोजगारवाडीसंदर्भात ठोस पाऊले टाकली आहेत, अशी कौतुकाची थाप मारली आहे.

जगभरात मंदीची लाट आहे, तशी ती महाराष्ट्रात आहे. म्हणून हतबलतेने आडाला तंगड्या लावून  बसण्यात अर्थ नाही. हातपाय हलवावे लागतील, असो टोला मोदी सरकारला मारला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्याबाबतीत एक भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र हे आर्थिक केंद्र आणि औद्योगिक राज्य आहे. त्यामुळे केंद्राने महाराष्ट्राला उभारी देण्यासाठी जास्तीची मदत करणे गरजेचे आहे. उद्योगमंत्री देसाई यांनी वेबिनार घेतले. यावेळी चर्चा केली. यात सूर निराशेचा नव्हता हे महत्वाचे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

गेल्या तीन महिन्यांत किमान १० ते १५ लाख लोकांनी रोजगार गमावला आहे. कापड उद्योग, बांधकाम, औद्योगिक कंपन्या, हॉटेल उद्योग, पर्यटन, वाहतूक, मनोरंजन, मॉल्स,सेवा उद्योग ठप्प झाले आहेत. या क्षेत्रात काम करणारा लाखो मजूर वर्ग पप्रांतीय असल्याने कोरोनाच्या भीतीने तो आपापल्या राज्यांत गेला. तो निदान वर्ष-दोन वर्षे तरी परत येणार नाही. अशावेळी ही सर्व कामे भूमिपुत्रांनी स्विकारली तर त्यांच्या मेहनतीने राज्याच्या उद्योग तसेच अर्थचक्रास चालना मिळेल. परप्रांतीय मजूर निघून गेले. त्यांच्या रिकाम्या जागांवर भूमिपुत्रांची नेमणूक करा, अशा सूचना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उद्योगपतींना दिल्यात. मात्र, ही सर्व कामे करण्यास आपला भूमिपुत्र तयार आहे काय, असा सवालही उपस्थित केला आहे.

उद्योग क्षेत्रातीलकामे करण्यासाठी भूमिपुत्रांची मानसिकता तयार करावी लागेल. ही सर्व कामे फार मोठ्या कौशल्याची नसतीलही, पण राष्ट्र उभारणीत या मजुरांचे योगदान नाकारता येत नाही. मजूर घाम गाळतो म्हणून कारखाने, इमारती, रस्ते, पूल उभे राहतात. महाराष्ट्रातून साधारण २० लाख मजूर  बाहेर गेले आहेत. भिवंडी, इचलकरंजी हे एकप्रकारे महाराष्ट्रातील 'मॅंचेस्टर'च आहे.

दरम्यान, ३५ वर्षांपूर्वी मुंबईतील गिरणी बंद पडल्यात. गिरणीच्या जमिनीवर मॉल्स उभे राहिलेत. कोरोनामुळे हे बंद झालेत. हा विचित्र योग आहे. राज्यातील लॉकडाऊन उठले तरी धारावीतील  लेदर उद्योग उभा राहिल काय, रेस्टॉरंटनेही तेच आहे.  हॉटेल्स, बांधकाम व्यवसाय सगळच ठप्प आहे. मात्र, हे सगळे हिम्मतीने सुरु करण्याची गरज आहे. त्यासाठी हिंमतही दाखवायला हवी, असे शिवसेनेने म्हटले आहे.