मुंबई : अनाथाश्रमातून बाहेर पडलेल्या निराधार युवक-युवतींचा आधार बनून त्यांच्या हितासाठी झटणा-या सागर रेड्डी या तरुणाचा संघर्षमय जीवनपट उलगडवून दाखवणा-या एका डॉक्युमेंट्रीचं प्रकाशन झालं.
झी २४ तासचे संपादक डॉ. उदय निरगुडकर आणि मांडके फाऊंडेशनच्या गव्हर्निंग काऊन्सिल सदस्या डॉक्टर अलका मांडके यांच्या उपस्थितीत ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित करण्यात आली.
सागर रेड्डी याच्या आईवडिलांचा खून आंतरजातीय विवाह केल्यानं करण्यात आला होता. वयाच्या दुसऱ्या वर्षी अनाथ झालेल्या सागर रेड्डीला आपलं बालपण अनाथाश्रमात घालवावं लागलं. आतापर्यंत ८०० हून अधिक मुलांचा आधार बनून त्यांच्या राहण्याची आणि शिक्षणाची जबाबदारी त्याने उचलली आहे.