मुंबई : मध्य रेल्वे लवकरच टुरिस्ट कोच सेवेत आणणार आहे. या डब्याचं छत काचेचं असणार आहे. भारतीय रेल्वे कारखानातर्फे हे विस्टा डोम कोच विकसीत करण्यात आलेत. पर्यटनासाठी विशेषतः निसर्गदर्शनासाठी हे कोच विशेष आहेत.
मध्य रेल्वेने पर्यटनला चालना देण्यासाठी हे विशेष कोच तयार केले आहेत. पर्यटकांना रेल्वे प्रवासाचा आणि पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी हे कोच आहेत. विस्टा डोम हे कोच प्रवाशी आणि पर्यटकांच्या पसंतीला पडतील अशी रचना बनवण्यात आली आहे.