नक्षलवाद्यांना अज्ञात राजकीय शक्तींचा पाठिंबा - संजय राऊत

संजय राऊत यांचा संशय नेमका कुणाकडे?

Updated: May 2, 2019, 06:40 PM IST
नक्षलवाद्यांना अज्ञात राजकीय शक्तींचा पाठिंबा - संजय राऊत

मुंबई : नक्षलवाद्यांना अज्ञात राजकीय शक्तींचा पाठिंबा असल्याचा संशय शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. नक्षल्यांकडे सर्व यंत्रणा असल्याचं दिसून येतं आहे. त्यांचा छडा लागला तर सरकार सोडणार नाही असं ते म्हणाले. नक्षल्यांविरोधात सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे स्ट्राईक करण्याची वेळ आल्याचं देखील ते म्हणाले.

नक्षलवाद्यांनी एकाच दिवशी दोन घटना घडवून आणल्या होत्या. कुरखेडा तालुक्यात भुसुरुंग स्फोट घडवून आणल्यानंतर त्यांनी जवानांच्या खाजगी वाहनाला लक्ष्य केले. लेंदारी पुलाजवळ नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. ज्यामध्ये एक डाईव्हर आणि १५ जवान शहीद झाले.

सकाळी जाळपोळ झालेल्या स्थळापासून जवळच ही घटना घडली आहे. १ मे महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला होता. त्यामुळे नक्षलवादी पुन्हा सक्रीय झाल्याची चर्चा आहे.