सेल्फीच्या नादात गेला जीव ? मुंबई पोलिसांकडून व्हिडीओ शेअर

या व्हिडीओत एक तरुण बहुमजली इमारतीवरून खाली पडताना दिसतोय. 

Updated: May 2, 2019, 02:12 PM IST
सेल्फीच्या नादात गेला जीव ? मुंबई पोलिसांकडून व्हिडीओ शेअर  title=

मुंबई : धोकादायक जागांवर सेल्फी घेण्याची सवय जिवावर बेतल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. याबाबत वारंवार जागृती करुनही तरुणाईतील सेल्फीवेड काही कमी होण्याचे नाव घेत नाही. मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅंडल वेबसाईटवर यासंदर्भात एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण बहुमजली इमारतीवरून खाली पडताना दिसतोय. 

हा एक साहसी सेल्फी घेण्याचा प्रयत्न होता ? की जबाबदार अॅडवेंचर ? काहीही उद्देश असेल पण अशी जोखिम घेणे चांगले नाही असे मुंबई पोलिसांनी ट्विटवरून म्हटले आहे. ही घटना नेमकी कुठे घडली याबद्दल मुंबई पोलिसांनी कोणती माहीती दिली नाही. सेल्फी घेण्याची वाईट सवय कमी व्हावी मुंबई पोलिसांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ही घटना मुंबईतील नाही एवढं मात्र हा व्हिडीओ पाहून स्पष्ट होतंय. मुंबई पोलिसांनाच याबद्दल अधिक माहीती असू शकते. 

गुगल रिवर्स इमेज सर्चमध्ये हा व्हिडीओ 24 एप्रिलला अपलोड झाल्याचे दिसून येते. हा व्हिडीओ चीनमधील एका वेबसाईटवरून अपलोड करण्यात आल्याचे त्यात स्पष्ट होते. तसेच यात ऐकू येणारी भाषा देखील चीनी भाषेशी मिळती जुळती असल्याचे वाटत आहे. पण मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅंडलवर यासंदर्भात कोणता दुजोरा नाही आहे.