पदवी अभ्यासक्रमात प्रोफेशनल कोर्सेसचा भाव वधारला

मुंबईतल्या कॉलेजेसच्या पदवी अभ्यासक्रमाची पहिली मेरीट लिस्ट जाहीर करण्यात आली. मुंबईतल्या काही महत्वाच्या कॉलेजांचा कटऑफ पाहिल्यावर प्युअर सायन्सच्या पदवीकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचेच चित्र आहे. 

Updated: Jun 22, 2017, 09:32 PM IST
पदवी अभ्यासक्रमात प्रोफेशनल कोर्सेसचा भाव वधारला

मुंबई : मुंबईतल्या कॉलेजेसच्या पदवी अभ्यासक्रमाची पहिली मेरीट लिस्ट जाहीर करण्यात आली. मुंबईतल्या काही महत्वाच्या कॉलेजांचा कटऑफ पाहिल्यावर प्युअर सायन्सच्या पदवीकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचेच चित्र आहे. 

बीएससीचा कटऑफ मोठ्या प्रमाणात घसरला असून एकेकाळी नव्वदीपार असलेलं बीएससी आता मात्र 70 टक्यांच्या घरात येवून पोहचलं आहे. सायन्सऐवजी विद्यार्थ्यांचा कल प्रोफेशनल कोर्सेसकडे अधिक असून 

बीएमएस,बीएमएम, अकाउंट अँड सायन्सकडे आणि बीए इंग्रजीकडे जास्त कल आहे. या खासगी कोर्सेसचा कट ऑफ 95 टक्क्याहून अधिक आहे. 

त्यामुळे शिक्षण क्षेत्रात सध्या याचीच चर्चा असून विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात बदलल्यामुळे कॉलेजांमध्येही तशी तयारी करावी लागणारेय.  
मुंबईतल्या कॉलेजांचा कट ऑफ काय असणार याकडे राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांची नजर असते.