सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय झालाय, योग्य वेळी जाहीर करु - संजय राऊत

एनडीएतील घटकपक्ष टीडीपीने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या काही मागण्या मान्य न झाल्याने ते बाहेर पडले आहेत.

Updated: Mar 8, 2018, 01:33 PM IST
सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय झालाय, योग्य वेळी जाहीर करु - संजय राऊत title=

दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : तेलगू देसम पक्षाने शिवसेनेकडूनच प्रेरणा घेतली असल्याचा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय. पण चंद्राबाबू नायडू यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आता शिवसेना काय करणार असा प्रश्न उपस्थित करू नये असा असा सल्लाही त्यांनी दिलाय. 

आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची आठवणही राऊत यानिमित्तानं करून दिली. NDA मधून बाहेर पडावं किंवा कसं याबाबतचा निर्णय योग्य वेळी घेऊ अशी भूमिकाही राऊत यांनी व्यक्त केली. गुळाच्या ढेपेला चिकटलेले आणखी काही मुंगळे तिथून निघण्याच्या तयारीत असल्याचंही ते म्हणाले...NDA सुरु असलेल्या या नाट्यमय घडामोडींसंदर्भात संजय राऊत यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी....