शिवसेनेच्या मेळाव्यात मनसेची गर्दी, शिवसेना नेते म्हणाले...

मनसेने फोटो आणि व्हिडिओ ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधलाय. यावरून शिवसेना नेत्यांनी पलटवार केलाय.   

Updated: May 11, 2022, 02:26 PM IST
शिवसेनेच्या मेळाव्यात मनसेची गर्दी, शिवसेना नेते म्हणाले...  title=

मुंबई : मनसे नेते आणि प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विट करून शिवसेनेवर निशाणा साधला. गजानन काळे यांनी शिवसेनेच्या सभेचा फोटो आणि व्हिडीओ ट्विट केला. यात फोटो शिवसेनेचा पण गर्दी मनसेची असे ट्विट केलंय. 

माणसं जमा करायला अजून राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का? असा सवाल गजानन काळे यांनी केला. तसेच, असली नकली म्हणणाऱ्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. काही तरी अस्सल हे तुमचे असु द्या. इतके ही नकली होऊ नका. नकली हिंदुत्ववादी... असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.

यावरून आता शिवसेना नेत्यांनी मनसेवर पलटवार केला आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला इतरांची गर्दी दाखवण्याची घाई गर्दी नाही. औरंगाबाद येथे होणारी मुख्यमंत्र्यांची सभा ही विराटच होईल, असे ते म्हणाले. 

तर, शिवसेनेचे खासदार प्रवक्ते अरविंद सावंत यांनीही कुणाची गर्दी दाखविण्याची वेळ कधीच शिवसेनेवर आली नाही. शिवसेनेचं एवढं दूर्भाग्य नाही. अशी वेळ शिवसेनेवर कधीच आली नाही आणि येणारही नाही, असे सांगितले.