वरळीतील जांबोरीच्या दहीहंडीवरून सेना-राष्ट्रवादीत रस्सीखेच

 दहिहांडी आयोजना वरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात वाद सुरु

Updated: Sep 3, 2018, 08:06 AM IST
वरळीतील जांबोरीच्या दहीहंडीवरून सेना-राष्ट्रवादीत रस्सीखेच  title=

मुंबई : मुंबईतल्या वरळीमधल्या जांबोरी मैदान इथे दहिहांडी आयोजना वरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात वाद सुरु आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठान मार्फत जांबोरी मैदान इथे आयोजन केल जायचं.  मात्र यंदा स्थानिक शिवसेना आमदार सुनिल शिंदे यांना जांबोरी मैदानात दहीहंडीच्या आयोजनाची परवानगी मिळाली आहे. सुनिल शिंदे यांना नियमानुसार ही परवानगी मिळाल्याचा दावा शिवसेनेनं केलाय.

सर्वांचं लक्ष  

वरळी जांबोरीतील दहीहंडी ही मुंबईतील एक मानाची हंडी मानली जाते. प्रसिद्ध गोविंदा पथक याठिकाणी थर लावायला येत असतात. सेलिब्रिटींची रेलचेल या ठिकाणी पाहायला मिळते. राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांच्यानावाने ही हंडी ओळखली जाते. पण यावर्षी  स्थानिक शिवसेना आमदार सुनिल शिंदे यांना जांबोरी मैदानात दहीहंडीच्या आयोजनाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आजची हंडी गोविंदा पथकांसोबत वरळीकरांचंही विशेष लक्ष असणार आहे.