मुंबई : हिरेन मनसुख प्रकरणात आता तिसऱ्या गाडीची एन्ट्री झाली आहे. पहिल्यांदा अंबानींच्या घराजवळ जी स्कार्पिओ सापडली होती, जिच्यात जिलेटीनच्या कांड्या होत्या, आणि त्या गाडी मालकाचा मृतदेह खाडीत मिळाला. दुसरी इनोव्हा जी कालपर्यंत दिसत असल्याचा दावा होता. तर आता तिसरी गाडी जी टाटा सुमोसारखी दिसणारी गाडी जी सचिन वाझे यांचा पाठलाग करत होती ती गाडी सचिन वाझे यांचा पाठलाग करत होती.
सचिन वाझे यांचा पाठलाग करणारी गाडी ही एटीएसची असल्याचं समोर आलं आहे. सचिन वाझे यांच्या हालचालींवर एटीएसची नजर असल्याचं समोर आलं आहे. माझा पाठलाग का करण्यात येत आहे, असा देखील सवाल सचिन वाझे यांनी केला आहे. सचिन वाझे यांचा ही गाडी मागील काही दिवसांपासून पाठलाग करत होती.
जेव्हा पोलीस आयुक्तांशी याविषयी सचिन वाझे चर्चा केली, यानंतर एटीएसने मान्य केलं की ही गाडी आमची आहे. या गाडीत अनेक गाडीच्या नंबरप्लेटही दिसून आल्या आहेत. एटीएसला आरोपींचा पाठलाग करताना या बनावट नंबर प्लेटसची मदत होते, असं सांगितलं जातं.
सचिन वाझे हे अंबानींच्या घरासमोर जी स्कार्पिओ गाडी स्फोटकांसह सापडली होती, त्या गाडीच्या मालकाच्या मृत्यू प्रकरणी अडचणीत आहेत. सचिन वाझे या प्रकरणात अनेक ठिकाणी दिसून आले.
यानंतर विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाशी सचिन वाझे यांचा काय संबंध असा सवाल केला होता. तसेच सचिन वाझे यांच्यावर हिरेन यांच्या पत्नीने देखील आपल्या पत्नींना सवाल केला आहे.
दुसरीकडे अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात सचिन वाझे आघाडीवर होते, म्हणून त्यांचं नाव हिरेन मनसुख प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा आरोप सत्ताधारींनी केला आहे.