मुंबई : एलफिन्स्टन-परळ पूलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटना ताजी असताना एलफिन्स्टन रोड स्थानकातील फूटओव्हर ब्रीजवर स्लॅब कोसळून महिला जखमी झाली.
तिकीट खिडकीजवळील स्लॅब कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. स्लॅब कोसळल्याने ३८ वर्षीय महिला जखमी झाली. या महिलेला तात्काळ केईएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तिथे उपचार करुन महिलेला सोडण्यात आलं.
चेंगरीचेंगरीच्या घटनेनंतर अवघ्या काही दिवसात ही घटना घडल्याने प्रवाशांमध्ये रेल्वेविरोधात संतापाचं वातावरण आहे. दरम्यान, मुंबईतल्या एलफिन्स्टन स्टेशनवरील चेंगराचेंगरीत २३ जणांना आपला जीव गमवावा लागला. तर ३३ प्रवासी जखमी झालेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १३ पुरुष, ८ महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने अलाहाबाद रेल्वे स्टेशनमधील घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या. चार वर्षांपूर्वी अशीच काहीशी घटना अलाहाबादमध्ये घडली होती. ही दुर्घटनाही फूटओव्हर ब्रिज कोसळल्याच्या अफवेने घडली होती.
दरम्यान, मुंबईच्या एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेच्या दोन दिवसाआधीच एका प्रवाशाने याबाबतच्या धोक्याचा इशारा दिला होता. संतोष आंधळे यांनी फेसबुक पोस्टवरुन याबाबतची समस्या मांडली होती. मध्य रेल्वेला या पोस्टमध्ये टॅगही करण्यात आले होते. त्यांनी फेसबूक पोस्ट टाकल्याच्या दोन दिवसानंतरच ही दुर्घटना घडली.