राज्यात तापमान वाढण्यास सुरूवात, तर दुसरीकडे अवकाळी पावसाचाही अंदाज

एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर  राज्यात अनेक जिल्ह्यात तापमान वाढण्यास सुरूवात झाली आहे. मात्र दुसरीकडे हवामान खात्याने रविवारपर्यंत

Updated: Apr 3, 2020, 02:41 PM IST
 राज्यात तापमान वाढण्यास सुरूवात, तर दुसरीकडे अवकाळी पावसाचाही अंदाज title=

मुंबई : एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर  राज्यात अनेक जिल्ह्यात तापमान वाढण्यास सुरूवात झाली आहे. मात्र दुसरीकडे हवामान खात्याने रविवारपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकावादळी वाऱ्यासह पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त केली आहे.

ढगाळ हवामानामुळे दिवसाच्या तापमानात चढ-उतार सुरू आहे. तर राज्याच्या तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली. तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत.

राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३७ अंशांच्या पुढे गेला आहे. उन्हाचा चटका असह्य होत असतानाचा विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या अवकाळी सरी येऊ शकतात.

गुरूवारी  सकाळपर्यंतच्या २४ तासांच्या आता मालेगाव येथे सलग दुसऱ्या दिवशी ४०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 

तर सोलापूर येथे ३९.६ अंश, अकोला येथे ३९.५, अमरावती आणि वर्धा येथे ३९.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सांगली, परभणी, ब्रह्मपुरी, नागपूर येथेही तापमान ३८ अंशांच्या पुढे गेले आहे.

मराठवाड्यापासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याने अवकाळी पावसाला पोषक हवामान होत आहे. 

रविवारपर्यंत विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.