शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारी बातमी! 2018 मधील बोगस शिक्षकांची यादी 'झी 24 तास'च्या हाती

याआधी 2021 मधील बोगल शिक्षकांची यादी दाखवली होती, आता 2018 मधील बोगस शिक्षकांची यादी आम्ही दाखवणार आहोत,

Updated: Mar 20, 2022, 09:53 PM IST
शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारी बातमी! 2018 मधील बोगस शिक्षकांची यादी 'झी 24 तास'च्या हाती title=

Bogus Teacher List : शिक्षण क्षेत्राला हादरवणारी आणखी एक मोठी बातमी आहे. राज्यातील 7880 बोगस शिक्षकांचा झी 24 तासनं पर्दाफाश केल्यानंतर आता 2018 मधील बोगस शिक्षकांची यादी झी 24 तासच्या हाती लागलीय. तुमच्या जिल्ह्यात नेमके किती शिक्षक बोगस आहेत याचा झी २४ तासच्या इन्व्हेस्टीगेशनमध्ये पर्दाफाश झालाय. 

या बोगस शिक्षकांची फाईलच झी २४ तास च्या हाती लागलीय. याआधी आम्ही तुम्हाला 2021 मधील बोगस शिक्षकांची यादी दाखवली होती. आता झी 24 तासच्या हाती 2018 मधीस बोगस शिक्षकांची यादीही लागलीय. 

2018 मध्ये तब्बल 1701 शिक्षकांनी पात्र नसतानाही गैरमार्गानं नोकरी मिळवल्याचं उघड झालंय. नेमके कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षक बोगस आहेत. या बोगस शिक्षकांनी कशाप्रकारे नोकरी मिळवलीय. मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत बोगस शिक्षकांचे लोण दिसून येत आहे. कोणत्या जिल्ह्यात नेमके किती बोगस शिक्षक सापडले आहेत ते पाहूयात.

मराठवाडा, खानदेशात सर्वाधिक बोगस शिक्षक
टीईटी २०१८ च्या परीक्षेत  बोगस शिक्षकांच्या यादीत नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, ठाणे या जिल्हयात बोगस शिक्षकांचे प्रमाण अधिक आहे. धुळयात (२६३), नाशिक( २३६), जळगाव (२१९), नंदुरबार (२०४), ठाणे (१०२), औरंगाबाद (७०), मुंबई पश्चिम (६८), मुंबई उत्तर (८३), मुंबई दक्षिण (३०), पालघर (३४), पुणे (४२), सोलापूर, (२८), अहमदनगर (२२) सांगली (२७), जालना (१४), बीड (३७), बुलढाणा (७४), अमरावती (३५), नांदेड (१९), कोल्हापूर (१५) अशी बोगस परीक्षार्थींची यादी समोर आली आहे.