दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 10 वी 12 वीसह अनेक परीक्षा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यात वाढत्या कोरोना संसर्गांला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर 19 एप्रिलपासून होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
वेद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून वैद्यकिय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या 19 एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार आहे. सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.