मुंबईत बेड्सची संख्या वाढणार, कोणत्या हॉस्पीटलमध्ये किती बेड्स ?

 मुंबईत 1780 बेडस् वाढणार आहेत.

Updated: Apr 15, 2021, 12:23 PM IST
मुंबईत बेड्सची संख्या वाढणार, कोणत्या हॉस्पीटलमध्ये किती बेड्स ?

मुंबई : मुंबईत बेडसची कमतरता पाहता महापालिकेने बेडस वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार मुंबईत 1780 बेडस् वाढणार आहेत. यांपैकी 70 आयसीयु बेडस् आणि जवळपास 1500 ऑक्सिजन बेड असणार आहेत. जसलोक हॉस्पिटलमध्ये एकूण 250 बेड हे डॅशबोर्डवर घेतले जातील. यात 40 आयसीयु बेड आहेत. तसेच सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्येही 30 आयसीयु बेड वाढवण्यात आलेयत. गोरेगांवच्या नेस्को जम्बो कोविड सेंटर येथे 1500 ऑक्सिजन बेड वाढवण्यात येतायत. मुंबईत कोरोना बेड्सचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेचं महत्वाचे पाऊल आहे.

बेडची कमतरता सोडवण्यासाठी हॉटेल्समधले बेडही कोरोना रुग्णांसाठी वापरले जाणार आहेत. खासगी रुग्णालयांसोबत फोर-फाईव्ह स्टार हॉटेल्सशी टायअप केला जाणार आहे. रिकव्हर होत असणारे आणि आयसीयु बेडची गरज नसणारे रुग्ण हॉटेल्समध्ये हलवले जाणार आहेत. अशा रुग्णांना हॉटेलमधील उपचारासाठी स्टेप डाऊन फॅसिलीटी दिली जाणार आहे.  

बॉम्बे हॉस्पिटलमधील रुग्णांच्या स्टेपडाऊन फॅसिलीटीसाठी मरिन ड्राईव्ह येथील इंटर कॉन्टीनेंटर हॉटेल तसेच एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलसाठी बीकेसी येथील ट्रायडंड हॉटेल बुक करण्यात आले आहेत.

स्टेप डाऊन फॅसिलीटी दिलेल्या हॉटेल्समध्ये जर पेशंटसोबत एका नातेवाईकासही राहायचे असेल तर त्यांना ट्विन रुम बुक करुन दिल्या जातील.

स्टेप डाऊन फॅसिलीटीच्या रुग्णांसाठी दर दिवसाला 4000 रुपया पर्यंतचे शुल्क आकारले जाईल. तसेच ट्विन रुम फॅसिलीटीसाठी 6000 रुपषे आकारले जातील

ज्या हॉटेल्समध्ये किमान 20 खोल्या असतील तेच हॉटेल स्टेप डाऊन फॅसिलीटी म्हणून खाmगी हॉस्पिटल वापरु शकणार आहेत. 

हॉटेलमधील डॉक्टरांची वेळोवेळी भेट, इतर औषधे आणि वैद्यकिय निकड पुरवणे ही हॉस्पिटलची जबाबदारी असणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केलंय.