सिद्धीविनायक मंदिर उडवण्याची धमकी देणाऱ्या प्रेमवीराला अटक

मंदिर उडवण्याची धमकी देणाऱ्या माथेफिरुला अटक

Updated: Jun 17, 2019, 01:34 PM IST
सिद्धीविनायक मंदिर उडवण्याची धमकी देणाऱ्या प्रेमवीराला अटक title=

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : ठाणे शहरातील विवियाना मॉलमध्य़े एक पत्र चिकटवून मुंबईतलं सिद्धीविनायक मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र ही धमकी दहशतवादी संघटनेनं नाही तर प्रेमवीराने दिल्याचं उघड झालं आहे. मुलीने मुलाला लग्नाला नकार दिला म्हणून राग धरून थेट सिद्धीविनायक मंदिर उडवण्याची धमकी या माथेफिरूने दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

सिद्धीविनायक मंदिर हे मुंबईतील सर्वाधिक प्रसिद्ध ठिकाण आहे. याठिकाणी रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. हे मंदिर नेहमी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिलं आहे. हे मंदिरात नेहमी पोलिसांची कडेकोट सुरक्षा असते. ५ ते ६ दिवसापूर्वी ही धमकी लिहिल्याची माहिती समोर आली आहे.

सिद्धिविनायक मंदिरात अनेक मोठ्या व्यक्ती आणि सेलिब्रिटी या नेहमी दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे हे मंदिर नेहमी चर्चेत असतं.