Rumors Of Bombs In Planes: काही दिवसांपूर्वी मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर तातडीने या विमानाची इमर्जन्सी लँडिग दिल्ली विमानतळावर करण्यात आली होती. आता अखेर या प्रकरणात नवीनच माहिती समोर येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी छत्तीसगडमधील राजनांदगाव येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी मुंबईत आणण्यात येत आहे. या प्रकरणातील चौकशीसाठी मुंबई पोलिस कमिश्नरांकडून पथक तयार कऱण्यात आलं होते. तिथेूनच त्यांनी मुलगा व त्याचा पालकांना सहार पोलिस ठाण्यात हजर करण्यात येणार आहे.
एअर इंडियाच्या ट्विटरवर एक मेसेज पाठवण्यात आला होता. यात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील ‘६ ई १२७५’ व ‘६ ई ५७’ ही इंडिगो कंपनीची विमाने तसेच न्यू यॉर्ककडे निघालेल्या ‘एआय ११९’ या विमानांत सहा दहशतवादी सहा किलो आरडीएक्ससह वावरत आहेत. असा तो मजकूर होता. या मेसेजनंतर विमानतळावर मोठा गोंधळ उडाला आहे. इंडिगोची विमान थांबवून त्यांची संपूर्ण तपासणी करण्यात आली. तर एअर इंडियाचे न्यूयॉर्कला जाणारे विमान दिल्लीत उतरवण्यात आले.
पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी एक्स कंपनीकडून मेसेज पाठवण्यात आलेल्या दोन्ही खात्याबद्दल माहिती मागवण्यात आली. त्यावेळी माहिती पाठवणारी व्यक्ती ही एकच असल्याचे समोर आले. पोलिसांनी अधिक तपास केला असता छत्तीसगड येथील एका अल्पवयीन मुलानेच हा सगळा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिस तपासात समोर आले की, अल्पवयीन मुलाने मित्राला अडकवण्यासाठी हा प्रकार केला होता. सूत्रांनुसार, अकरावीत शिकणाऱ्या या मुलाने मित्राबरोबर मोबाइलचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र व्यवसाय बंद पडल्यानंतर मित्राकडून सदर मुलाला तीन लाख रुपये येणे होते. या रागातून त्याने मित्राच्या अकाउंटवरुन संदेश पाठवले असण्याची शक्यता आहे.
सोमवारी 2 वाजण्याच्या सुमारास हे विमान मुंबईहून न्यूयॉर्कसाठी रवाना झाले होते. मात्र, लगेचच दिल्ली विमानतळावर विमानाला डायवर्ट करण्यात आले आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमानतळ इमर्जन्सी लँडिग करण्यात आले होते.