गाडीवर दगडफेक : भाजपचे शिष्टमंडळ केंद्र सरकार गृह सचिव यांना भेटणार

BJP delegation to meet Central Government Home Secretary : भाजप नेते किरीट सोमय्या गाडीवर दगडफेक प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबई भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीसाठी मुंबईहून रवाना झाले आहे.  

Updated: Apr 25, 2022, 09:13 AM IST
गाडीवर दगडफेक : भाजपचे शिष्टमंडळ केंद्र सरकार गृह सचिव यांना भेटणार  title=

मुंबई : BJP delegation to meet Central Government Home Secretary : भाजप नेते किरीट सोमय्या गाडीवर दगडफेक प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबई भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीसाठी मुंबईहून रवाना झाले आहे. आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, आमदार पराग शाह, आमदार राहुल नार्वेकर, विनोद मिश्रा आणि किरीट सोमैया हे सर्व सकाळी मुंबईतून दिल्लीला विमानाने निघाले. नॉर्थ ब्लॉक दिल्ली येथे केंद्र सरकारचे गृह सचिव यांना भेटणार आहेत. (Throwing stones at Kirit Somaiya's car: BJP delegation to meet Central Government Home Secretary)

राणा दाम्पत्याला खार पोलीस ठाण्यात भेटण्यासाठी गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसेनेने हल्ला केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यात सोमय्या जखमी झाले होते. त्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  तर सोमय्या यांच्या चालकाविरोधातही भरधाव वेगाने गाडी चालवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खार पोलीस ठाण्यात आलेल्या सोमय्या याच्या चालकाने भरधाव गाडी चालवून दोघांना किरकोळ जखमी केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

सोमय्या पोलीस स्टेशनमधून निघाल्यानंतर त्यांच्या गाडीवर बाटल्या, चपला आणि दगडफेक करण्यात आली. त्यांच्या गाडीची काच यामुळे फुटली. ज्यामध्ये सोमय्या हे जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सोमय्या हे बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि गाडीवर झालेल्या हल्ल्याची तक्रार दिली. भाजपचे आमदार आशिष शेलार हे देखील बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये सोबत होते.