आज मुंबईचं विमानतळ पाच तास बंद

मुंबई विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Updated: Oct 23, 2018, 08:00 AM IST
आज मुंबईचं विमानतळ पाच तास बंद  title=

मुंबई : दर आठवड्याला रेल्वेच्या मेगाब्लॉक बद्दल आपण ऐकतो. रेल्वे ट्रॅक दुरुस्ती, नवे मार्ग यासाठी हा ब्लॉक घेतला जातो. यावेळी प्रवाशांची तारांबळ होते पण आधीच जाहीर केलेल्या मेगाब्लॉकमुळे गैरसोय टाळता येते. अशीच थोडीफार धावपळ आज विमान प्रवाशांची होणार आहे.  आज मुंबईचं विमानतळ पाच तास बंद असणार आहे. दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी मुंबई विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी पाच वाजेपर्यंत विमानतळावरून एकही उड्डाण होणार नाही किंवा एकही विमान विमानतळावर उतरणार नाही.

प्रवाशांना आवाहन 

याबाबतची सूचना अगोदरच जारी करण्यात आली होती. त्यानुसार विमानानं प्रवास करणाऱ्यांना आपलं वेळापत्रक आखण्याचं आवाहन विमानतळ प्रशासनातर्फे करण्यात आलं होतं.

संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मुंबई विमानतळाची सेवा पुन्हा पूर्ववत सुरू होईल.