मुंबई : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना परत जाण्यासाठी २ विशेष गाड्या सोडल्या आहेत. शेतकऱ्यांच्य़ा अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.
मुंबईपासून २०० किलोमीटर दूर नाशिक जिल्ह्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळांची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.
आंदोलन संपल्यानंतर आता शेतकऱ्यांना पुन्हा जाण्यासाठी मुंबई ते भुसावळ साठी २ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. ८.५० मिनिटांनी पहिली तर १० वाजता दुसरी विशेष गाडी सोडली जाणार आहे. ऑल इंडिया किसान महासभेच्या नेतृत्वात जवळपास 30,000 शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मुंबईच्या आजाद मैदानात ते जमले होते. आज विधानसभेला हे शेतकरी घेराव घालणार होते. पण मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत यातून तोडगा काढला.