पुढच्या २४ तासांत राज्यात पावसाची शक्यता

येत्या २४ तासांत राज्यातल्या बहुतांश भागात पाऊस होणार आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.

Updated: Mar 19, 2018, 01:42 PM IST
पुढच्या २४ तासांत राज्यात पावसाची शक्यता title=

मुंबई : येत्या २४ तासांत राज्यातल्या बहुतांश भागात पाऊस होणार आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.

विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेनं ही माहिती दिलीय... 

या पावसाच्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांनी योग्य काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.  मागच्या आठवड्यातही राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालाय. रविवारी रात्रीही कल्याण, डोंबिवली परिसरात पावसाने हजेरी लावली होती.