'वंदे मातरम्'वरुन अबू आझमी, वारिस पठाण याचे फुत्कार

एकवेळ देश सोडेन पण वंदे मातरम् म्हणणार नाही, असं वादग्रस्त विधान करून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी नवा वाद उकरून काढलाय. 

Updated: Jul 27, 2017, 07:09 PM IST
'वंदे मातरम्'वरुन अबू आझमी, वारिस पठाण याचे फुत्कार title=

मुंबई : एकवेळ देश सोडेन पण वंदे मातरम् म्हणणार नाही, असं वादग्रस्त विधान करून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी नवा वाद उकरून काढलाय. 

तर शिवसेनेनंही या दोघा आमदारांना सडेतोड उत्तर देत वंदे मातरम म्हणायचे नसेल तर पाकिस्तानात जा अशा शब्दात परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी सुनावलंय. त्यामुळं आता हा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. 

मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भाजप आमदार राज पुरोहित राज्यातल्या शाळा-कॉलेजेसमध्येही वंदे मातरम म्हणणे सक्तीचे करण्याची विनंती केलीय. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतलीय. 

तसंच वेळ आली तर सभागृहातही मुद्दा उपस्थित करण्याची तयारी पुरोहित यांनी दर्शवलीय.