मुंबई महापालिका शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचे

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचं करण्यात आलंय. त्यामुळं आता दर सोमवारी आणि शुक्रवारी पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वंदे मातरमचं गायन सक्तीचं करण्यात आलंय. 

Updated: Aug 10, 2017, 06:32 PM IST
मुंबई महापालिका शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचे title=

मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचं करण्यात आलंय. त्यामुळं आता दर सोमवारी आणि शुक्रवारी पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वंदे मातरमचं गायन सक्तीचं करण्यात आलंय. 

काँग्रेस आणि सपाचा विरोध डावलून भाजपनं मांडलेली सूचना मंजूर करण्यात आलीय. भाजप नगरसेवक संदीप पटेलांनी ही सूचना केलीये.

यासंदर्भातला प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवला जाणार आहे. त्यामुळं यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.