'तुम्ही प्रेमाची खिल्ली उडवली, आता हे सगळं पाहून...'; अंकिता-विकीचा रोमांस पाहून नेटकरी संतप्त!

Ankita Lokhande Trolled :  अंकिता लोखंडेनं नवऱ्यासोबतचे 'ते' फोटो शेअर केल्यानंतर नेटकरी संतप्त!

दिक्षा पाटील | Updated: Sep 21, 2024, 05:56 PM IST
'तुम्ही प्रेमाची खिल्ली उडवली, आता हे सगळं पाहून...'; अंकिता-विकीचा रोमांस पाहून नेटकरी संतप्त!  title=
(Photo Credit : Social Media)

Ankita Lokhande Trolled : छोट्या पडद्यानंतर मोठ्या पडद्यावर स्वत: च्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. अंकिता लोखंडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या ती तिचा नवरा विकी जैनसोहत जॉर्जियामध्ये सुट्टीचा आनंद घेते. जॉर्जियाच्या सुंदरतेविषयी सांगत त्यांनी काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ते पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

अंकिता लोखंडेनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यात अंकितानं जॉर्जियात असलेल्या सुंदर ठिकाणांचा फोटो शेअर केला आहे. एका फोटोत अंकिता तिचा नवरा विकी जैनच्या मांडीवर बसली आहे. त्यांची जोडी ही खूप सुंदर दिसते. त्या दोघांचे हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, असं देखील म्हटलं जातं की आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी ते तिथे गेले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दरम्यान, त्यांचे हे फोटो पाहिल्यानंतर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'इतकं प्रेम, बिग बॉसमध्ये इतकं का भांडत होतात? उगीच कारण नसताना बिग बॉसमध्ये जाऊन स्वत: च्या प्रेमाची खिल्ली उडवून घेतली. आता हे सगळं पाहून विश्वास होत नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'बिग बॉसच्या भांडणानंतर लाफ्टर शेफमध्ये दोघांची फनी बाजू पाहायला मिळाली. ते एक चांगलं झालं. काहींनी त्यांची स्तुती केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'तुम्ही दोघं एकत्र खूप छान दिसता.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'अंकिता अजूनही किती सुंदर दिसते.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अंकिता आणि विकी हे दोघं छोट्या पडद्यावरील कलाकार कनिका मान, हेली शाह, रोहन मेहरा, चेतना पांडे आणि रिया शर्मासोबत जॉर्जियामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : 'याला बाहेर काढा...', जेव्हा दिग्दर्शकानं जितेंद्र यांना चित्रपटाच्या सेटवरून दाखवला होता बाहेरचा रस्ता

अंकिता आणि विकी जैन हे रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17' मध्ये एकत्र दिसले होते. सध्या हे दोघं 'लाफ्टर शेफ्स-अनलिमिटेड एंटरटेनमेंट'मध्ये दिसत आहेत. या शोमध्ये त्यांच्यासोबत कृष्णा अभिषेक, राहुल वैद्य, करण कुंद्रा, निया शर्मा, जन्नत जुबैर रहमानी, रीम शेख, सुदेस लहरी आणि कश्मीरा शाह देखील आहेत. तर या शोचं सुत्रसंचालन भारती सिंग करते आणि शेफ हरपाल सिंग सोखी हे या शोचे परिक्षक आहेत.