राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना भाजीपाला आणि डाळी महागल्या

दुष्काळी परिस्थितीत महागाईचा भडका

Updated: Jun 6, 2019, 07:08 PM IST
राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना भाजीपाला आणि डाळी महागल्या title=

सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने भाजीपाल्यासह डाळींना महागाईचा फटका बसला आहे. त्यामुळे उन्हासह महागाईचे चटके देखील आता सामान्यांना सहन करावा लागणार आहे.

उन्हाचा पारा वाढत असल्याने भाज्यांचे भाव सुद्धा वाढू लागले आहेत. मुंबईमधील बाजारात सध्या भाज्यांचे आणि डाळींचे चढेभाव अनेकांसाठी चिंतेचा आणि चर्चेचा विषय बनले आहे. परंतु ह्या महागलेल्या भाजीपाल्याचा आणि डाळींच्या वाढलेल्या किंमतीमधून शेतकऱ्यांना मात्र तितकासा थेट फायदा होताना दिसत नाही.

भाज्यांची आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे गेल्या आठवडाभरापासून भाज्यांचे दर हे 20 ते 30 रुपयांनी वाढलेले पाहायला मिळाले. यामुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसत आहे 

भाज्यांचे दर

भाजी  - रिटेल भाव - होलसेल भाव
हिरवी मिरची - ८०  - ६० रूपये
अद्रक - १२० - १०० रुपये
कांदा -२० रूपये
लसुण -१२०-१०० रूपये
मेथी - ३०-२५ रूपये जुडी
कोथिंबीर -४० -२५ रूपये
पालक - ४०-३० रुपये
लिंबू -४०० ला १०० नग
फरस-बी - १२०-१०० रूपये किलो
मटार - १२०- ९० रुपये
शिमला -३०-४० रूपये
भेंडी - ३० ४० रुपये
टमाटे -४०-५० रुपये

पावसाळ्या आधीच अनेक जण घरात धान्य आणि डाळी भरून ठेवतात. त्यामुळे देखील मागणी वाढल्याचं दिसून येतं आहे. त्यामुळे डाळी देखील महागल्या आहेत.

डाळींचे भाव

मुग डाळ -१००
उडीद डाळ -१००
तुरडाळ - १००
मसूर डाळ - ८०
चना डाळ -८०

जीवनावश्यक वस्तूंचे हे वाढलेले भाव हे पावसाळा संपेपर्यंत तरी असेच राहण्याची शक्यता आहे. पावसाळ्यानंतर नवीन पिक बाजारात येईल.