मुंबई : अखेर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि सध्याचे दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांचा हट्ट भाजपने मान्य केला आहे. विधानपरिषद ११ जागेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी महादेव जानकर यांना पुन्हा संधी देणार असल्याचं भाजपने जाहीर केले होते. महादेव जानकर हे रासप या त्यांच्या पक्षाचा तिकिटावर निवडणूक लढवण्याचा हट्ट धरला. मात्र परिषद निवडणुकीचा अर्ज भरायला वेळ लागत असल्याने आणि ३ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची वेळ असल्याने जानकर यांचा हट्ट अखेर मान्य केला गेला.
भाजपचे पाच उमेदवार निवडून येणार असल्याने पक्षाने विविध समाजांना सामावून घेतले आहे. दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, भाई गिरकर, राम पाटील रातोळीकर, रमेश पाटील, निलय नाईक या विविध समाजांतील नेत्यांना भाजपने संधी दिली आहे.