प्रतिनिधी प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार: नवं पण हक्काचं घर असावं असं स्वप्न प्रत्येकाचं असतं. घरं तर ताब्यात मिळालं बिल्डच्या गलथान कारभाराचा फटका एक दोन नाही तर तब्बल 900 कुटुंबांना बसला आहे. मुंबई उपनगरात बिल्डरच्या भोंगळ कारभाराचे परिणाम या कुटुंबियांना भोगावे लागत आहेत. त्यामुळे या 900 कुटुंबियांमध्ये संतापाची लाट आहे.
विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी इथल्या एक्रोपॉलिस या उच्चभ्रू सोसायटीतील तब्बल 900 कुटुंब गेल्या 2 दिवसांपासून अंधारात आहेत.
या सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना बिल्डरने 3 वर्षांपूर्वी घराचे पझेशन दिलं. पण त्यांच्या नावावर अजूनही वीजमीटर दिलेला नाही. त्यामुळे इथल्या रहिवाशांना नाईलाजाने बिल्डरने लावलेल्या कन्स्ट्रक्शन मीटरचा आधार घ्यावा लागत आहे. त्याचं बिल ब्लिडरनं या रहिवाशांकडून घेतलं. पण महावितरणला त्यानं 1 कोटींची रक्कम दिली नाही त्यामुळे महावितरणने या संकुलाची वीज खंडित केली.
या सोसायटीमध्ये राहणाऱ्या 1BHK धारक कुटुंबांकडून तब्बल 1200 तर 2BHK मध्ये राहणाऱ्यांकडून 1500 रुपये बिल्डरने घेतले आहेत. याशिवाय एसी आणि हाय व्होल्टेज उपकरणं असणाऱ्यांकडून वेगवेगळे पैसे या बिल्डरनं आकारले आहेत. इतकं सगळं करूनही या कुटुंबांच्या नावावर मीटर मात्र झाला नाही. तर बिल्डरनं पैसे न भरल्यामुळे आता या घरांमध्ये होणारा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
बिल़्डक केवळ रहिवाशांकडून पैसे उकळत आहे. दर महिन्याला बिल भरूनही ते बिल्डर महावितरणाला देत नसल्यानं थकबाकी झाली आहे. आतापर्यंत तब्बल 2 वर्षांचं बिल मिळून 1 कोटी 10 लाख रुपये महावितरणाला थकवल्यानं आता वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. आता हा बिल्डर आम्हाला कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे इथले राहविवाशी सांगत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.