अमानुषतेचा कळस! अल्पवयीन मुलांना नग्न करून मारहाण

या प्रकरणाची गंभीर दखल घेत मारहाण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Updated: Feb 20, 2021, 04:46 PM IST
अमानुषतेचा कळस! अल्पवयीन मुलांना नग्न करून मारहाण title=

अंबरनाथ: अमानुषतेचा कळस गाठणारी घटना मुंबईजवळच्या उपनगरातून समोर आली आहे. अल्पवयीन मुलांना नग्न करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथमध्ये अवघ्या 12 ते 13 वर्षांच्या 2 लहान मुलांसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या दोन मुलांना नग्न करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनंतर अंबरनाथ शहरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या बाबू गुंडे या विक्षिप्त व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत.

पश्चिम भागातील चिंचपाडा खदान परिसरातला हा प्रकार घडला. मुलींची छेड काढण्याच्या संशयावरून बाबू गुंडेनं या लहान मुलांना नग्न करून मारहाण केली. इतकंच नाही तर लहान मुलांना नग्नावस्थेत परिसरातून चालत घरी पाठवलं. तर बाबू याचा एक साथीदार मात्र या सगळ्याचं चित्रीकरण करत होता.  

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी बाबू गुंडे आणि त्याच्या आणखी एका साथीदाराविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपी बाबूला बेड्या ठोकल्या आहेत.