close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विठ्ठल कामतांच्या ऑर्कीड हॉटेलमध्ये बाप्पासाठी खास सजावट

विलेपार्ले इथल्या विठ्ठल कामत यांच्या ऑर्कीड हॉटेलमध्ये अनोख्यापद्धतीनं बाप्पासाठी खास सजावट करण्यात आली आहे. 

Updated: Aug 28, 2017, 08:39 PM IST
 विठ्ठल कामतांच्या ऑर्कीड हॉटेलमध्ये बाप्पासाठी खास सजावट

मुंबई : विलेपार्ले इथल्या विठ्ठल कामत यांच्या ऑर्कीड हॉटेलमध्ये अनोख्यापद्धतीनं बाप्पासाठी खास सजावट करण्यात आली आहे. 

पिण्याच्या पाण्याच्या मोकळ्या बाटल्या, म्युझिक सी. डी.,पॅकिंगसाठी वापरलं जाणार लाकूड या सगळ्या वस्तूंचा वापर करून बाप्पांची सजावट हटके पद्धतीनं करण्यात आली आहे. 

पाण्याच्या बाटल्यांचा वापर करून त्यापासून आकर्षक फुलं तयार करण्यात आली आहे त्यामुळे ही सजावट अधिकच आकर्षक दिसतेय.

विठ्ठल कामत यांच्या ऑर्कीड हॉटेलमध्ये पर्यावरणासाठी नवनवीन प्रयोग करून प्रदुषण होणार नाही यावर जोर देण्यात येतो.