Mumbai local viral video: मुंबईकर आणि लोकल हे कनेक्शन सर्वात हटके आहे .तुम्ही कधीही ट्रेनने प्रवास करा मुख्यतः कामाच्या वेळा असतील तर खच्च भरलेली ट्रेन पाहून ट्रेनमध्ये पाय ठेवावा कि नाही हा प्रश्न पडतो पण काय करणार सर्वाना वेळेत घरी पोहचायचं असतं, त्यामुळे गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये कसेबसे आपण चढतो. (Watch Viral Video of Women Fighting For Seat in Mumbai Local Train Trending Video)
मुंबईच्या लोकलमध्ये सीट पकडण्यासाठी प्रवाशांची नेहमीच धडपड सुरु असते. त्यावरुन अनेकदा वाद देखील होतात. पण काही वादांचं रुपांतर हे हाणामारीत देखील होताना पाहायला मिळतं. सोशल मीडियावर (social media) हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. महिला सीटवरून एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. एकमेकांचे केस ओढत आहेत. मात्र या व्हिडिओत आणखी एक महिला दिसतेय. जी हसताना दिसत आहे. लोकं यावर आता प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
लोकल ट्रेनमध्ये सीटसाठी महिला चांगल्याच भिडल्या. पण लोकांच्या नजरा नंतर पडल्या त्या बाजुला उभ्या असलेल्या एका मावशीवर. बस असो, मेट्रो असो की लोकल ट्रेन. प्रवाशांमध्ये सीटवरून वाद होणे सामान्य झाले आहे. असे वादाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लोकल ट्रेन नवी मुंबईतील तुर्भे स्थानकावर असताना 3 महिलांमध्ये वाद झाला. महिला सीटवरून एकमेकांशी भांडत होत्या. (local train fighting video)
हा व्हिडीओ @RoadsOfMumbai या ट्विटर हँडलने शेअर केला होता. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिलाय. पण आता चर्चा ही त्या भांडणाऱ्या महिलांची होत नसून बाजुला उभ्या असलेल्या निळी साडी घातलेल्या मावशींची होत आहे. पण असं का?
या व्हायरल VIDEO मध्ये तीन महिलांमध्ये जोरदार भांडत होतं. दोन महिला मिळून एका महिलेला मारहाण करत होत्या. ते एकमेकांचे केस ओढत होत्या. एकमेकांना मारत होत्या. पण यावेळी काही युजर्सची नजर जवळच उभ्या असलेल्या मावशींवर गेली. कारण हे भांडण पाहून त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हस्य येत होतं. एका यूजरने लिहिले की, निळ्या साडीतील आंटी वेगळीच मजा घेत आहेत! त्याचवेळी काही जण म्हणाले की बायकांचा लढा फार धोकादायक आहे भाऊ!
Waah-men pic.twitter.com/2YxmhUhUJm
— SaffronFire (__Saffron_Fire_) January 7, 2023
'ठाणे-पनवेल' लोकलचा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. हा वाद कोणीतरी मोबाईलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आहे. या प्रकरणात आयपीसी कलम 353, 332 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Watch Viral Video of Women Fighting For Seat in Mumbai Local Train Trending Video)