महाराष्ट्र बंद : वेस्टर्न, हार्बर, मध्य रेल्वेसह मुंबई मेट्रोवर ही परिणाम

भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद आज उमटायला सुरुवात झाली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 3, 2018, 12:25 PM IST
महाराष्ट्र बंद : वेस्टर्न, हार्बर, मध्य रेल्वेसह मुंबई मेट्रोवर ही परिणाम title=

मुंबई : भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद आज उमटायला सुरुवात झाली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

मुंबईमध्ये आंदोलन वाढत चाललं आहे. मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल ट्रेनवर देखील आता याचा परिणाम दिसायला लागला आहे. 

मध्य रेल्वे उशिराने

मध्य रेल्वेही आता विस्कळीत झाली आहे. घाटकोपर रेल्वे स्टेशनवर आंदोलक ट्रॅकवर उतरले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली आहे. विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनजवळ काही काळ रेल्वे अडवून ठेवण्यात आली होती. मध्ये रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने धावत आहे.

हार्बर रेल्वे विस्कळीत

हार्बर मार्गावरील वाहतूक ही विस्कळीत झाली आहे. गोवंडी आणि जुईनगर येथे रेलरोको सुरु आहे.

मुंबई मेट्रोही बंद

घाटकोपर ते एअरपोर्ट रोड स्टेशनदरम्यान मुंबई मेट्रोच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही काळात वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.

वेस्टर्न रेल्वेवर परिणाम

वेस्टर्न रेल्वेवर ही महाराष्ट्र बंदचा परिणाम दिसत आहे. नालासोपारा स्थानकावर मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते. काही काळ त्यांनी ही वाहतूक रोखून धरली होती.