पश्चिम रेल्वेमध्ये ६८९८ पदांची भरती, अर्ज भरण्याची शेवटची तारीख...

कनिष्ठ अभियंता, स्टेनो इ.पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. 

Updated: Jun 2, 2018, 06:02 PM IST
पश्चिम रेल्वेमध्ये ६८९८ पदांची भरती, अर्ज भरण्याची शेवटची तारीख... title=

मुंबई : पश्चिम रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर भरती होत आहे. यासंदर्भातील अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता, स्टेनो इ.पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या वेबसाईटवर यासंदर्भातील अधिक माहिती तुम्हाला मिळू शकणार आहे.  १५ जून २०१८ पर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करु शकता.

पद आणि रिक्त जागा 

एकूण जागा - ६८९८ 

कनिष्ठ अभियंता -१६७ 

स्टेनो - २८ 

वरिष्ठ गट अभियंता - ११५ 

वॉचमन - १ 

सफाईवाला - ०४ 

कुक -०५ 

मेल गार्ड - ०६

वरिष्ठ अभियंता - १४ 

वाहन चालक - ०६ 

लाइनमॅन - २७ 

नोकरीचे ठिकाण: मुंबई

पात्रता: डिप्लोमा

पगार : रू. ९,३०० रु. ३४,८०० / - दरमहा