नालासोपाऱ्यात पश्चिम रेल्वे वाहतूक पावसामुळे विस्कळीत; शाळांना सुट्टी

कांदिवली, बोरीवली, मालाड, दहीसर, अंधेरीमध्येही पावसाच्या जोरदार सरी सतत कोसळत आहेत

Updated: Jul 9, 2018, 09:46 AM IST
नालासोपाऱ्यात पश्चिम रेल्वे वाहतूक पावसामुळे विस्कळीत; शाळांना सुट्टी title=

नालासोपारा: वसई, विरार, नालासोपाऱ्यात सलग तिसऱ्या दिवशीही पाऊस सुरूच असून, कधी संथ तर, कधी मुसळधार असी संततधार सुरूच आहे. शहरात सर्वत्र पाणीच पाणी साचलंय. त्यामुळे परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे वसई, विरार परिसरातल्या सर्व शाळांना आज (सोमवार, २ जुलै) सुट्टी देण्यात आलीय. नालासोपाऱ्यात पश्चिम रेल्वेचे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे बोरीवली ते विरार दरम्यानची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं सुरू आहे. आज दिवसभर उत्तर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इकडे कांदिवली, बोरीवली, मालाड, दहीसर, अंधेरीमध्ये सतत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.  

कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, अंधेरी या भागात पावसाच्या सरी

दरम्यान, काल पासून उपगरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अधून - मधून विश्रांती घेत असल्यामुळे पाणी कमी प्रमाणत जमा होत आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, अंधेरी या भागात सतत पावसाच्या सरी सुरू आहेत.

मुंबई आणि उपनगर परिसरात दमदार पाऊस

मुंबई आणि उपनगर परिसरात कालपासून दमदार पाऊस सुरू आहे. रविवारी दिवसभर झालेल्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. पावासाचा जोर ओसरल्यावर पाण्याचा निचरा संध्याकाळी झाला. संततधार पावसामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागांत गुडघाभर पाणी साचलं. हिंदमाता, परळ टीटी, गांधी मार्केट, सायन,  अँटॉप हिल, बैलबाजार कुर्ला, शीतल सिनेमा, वांद्रे नॅशनल कॉलेज, मिलन सबवे, बीकेसी परिसरात पाणी तुंबलं... त्यामुळं जनजीवन काहीसं विस्कळीत झालं.