विधानसभा अध्यक्षपदावर कोणाची होणार नियुक्ती? राहुल गांधींनी मागवली मंत्र्यांची यादी

विधानसभा अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार?

Updated: Dec 25, 2021, 08:07 PM IST
विधानसभा अध्यक्षपदावर कोणाची होणार नियुक्ती? राहुल गांधींनी मागवली मंत्र्यांची यादी title=

दीपक भातुसे, मुंबई : विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. महाविकासआघाडी सरकारकडून हे पद काँग्रेसकडेच राहणार आहे. पण या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. याआधी विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी तर महाविकास आघाडीला थेट आव्हान दिलं होतं.  

हिंमत असेल तर नियमांत बदल न करता निवडणूक लढवून दाखवा. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकासआघाडीचे मत फुटले होते. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत असं होऊ नये अशी भीती महाविकास आघाडीला आहे. त्यामुळं थेट विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचे नियम बदलण्यात आले आहेत. असा आरोप फडणवीसांनी केला होता.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी मागवली असल्याची माहिती पुढे आली आहे. राहुल गांधींनी मंत्र्यांची यादी मागवल्याने विधानसभा अध्यक्षपदावर मंत्र्यांची नियुक्ती केली जाणार का अशी चर्चा आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी संग्राम थोपटे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा असताना ही नवी चर्चा सुरू झाली आहे

दुसरीकडे नितीन राऊत यांचा मागासवर्गीय सेलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतल्याने राऊत यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुले या पदावर कोणाची नियुक्ती होते याकडे राज्याचं लक्ष लागून आहे.